Thursday, August 12, 2010

देती मनूकथांचे सदैव दाखले आहे अजून त्याचे हमाल मोजके







मोजके

आल्या क्षणात काही सवाल मोजके
गेल्या क्षणास केले बहाल मोजके








रडवून कोण गेले, हिशोब ना कधी

जपले मनात ओले रुमाल मोजके




अलवार आठवांची अबोल पावले
पिंगा भरात घाली टपाल मोजके




देती मनूकथांचे सदैव दाखले
आहे अजून त्याचे हमाल मोजके












बखरीत नोंदलेले खरे असेल का ?
बोले न शब्द साक्षी महाल मोजके




















No comments:

Post a Comment