Friday, May 27, 2011

संशोधनादरम्यानचे अनुभव


संशोधनादरम्यानचे अनुभव
·        सदर विषयावर संशोधन करताना स्ट्रेचर हमालांना त्यांच्याबद्दल माहिती विचारणारे पहिले आम्हीच होतो तसेच इतक्या वर्षांच्या त्यांच्या कामामध्ये त्यांच्याबद्दल विचारपूस करणारे आम्हीच असल्याने त्यांच्याकडून आम्हाला या संशोधनासाठी उत्तम सहकार्य लाभले. त्यांनी सर्वेक्षणादरम्यान स्वतः आणि आपल्या सहकाऱ्यांना सहभागी करुन घेतले. 
·        रेल्वे स्ट्रेचर हमाल जखमी/ मृत व्यक्तीला उचलताना वैयक्तिक काळजीकडे कसे दुर्लक्ष करतात याचा अनुभव विक्रोळी रेल्वे स्थानकावर १३ मे २०११ रोजी दुपारी २ वाजता घडलेल्या रेल्वे अपघातानंतर आला. अपघातामध्ये त्या व्यक्तीचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले होते. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीला उचलून रेल्वे स्थानक प्रबंधकाच्या कार्यालयाजवळ आणताना तसेच पंचनामा करण्यासाठी संपूर्ण शरीराची तपासणी करताना त्या स्ट्रेचर हमालाने कोणत्याही प्रकारची वैयक्तीक काळजी (ग्लोव्हज् इ.) घेतली नव्हती.

No comments:

Post a Comment