Saturday, October 30, 2010

घाटकोपरच्या मुलाखतीदरम्यानच्या एक लायसन्स हमलाचा बॅच

संशोधनासाठी झालेल्या मुलाखती आणि उपलब्ध, एकत्रित करण्यात आलेली माहिती

संशोधनासाठी झालेल्या मुलाखती
  1. डाॅ. रिटा सावला- मानसोपचार तज्ञ (संस्थापक राधी फाऊंडेशन)
  2. समीर झवेरी- अध्यक्ष, मुंबई सब-अर्बन पॅसेंजर असोसिएशन
  3. सुनिल गायकवाड- वरिष्ठ पोलिस निरीक्षक (RPF) भायखळा
  4. डी.एन. माने - वरिष्ठ पोलिस निरीक्षक (GRP) छत्रपती शिवाजी टर्मिनस
  5.  चंद्रशील तांबे- प्रा. सी.एच.एम काॅलेज
  6. संजय रानेड- प्रा. MCJ
  7. डाॅ.पी.एम. कडुकर, prof, labour Institute

Pilot study साठी मुलाखती/ सर्वेक्षण
भायखळा, घाटकोपर, छत्रपति शिवाजी टर्मिनस

Statistics

RTI info from Central Railway

Info from Sameer Zaveri

सर्वेक्षणासाठी प्रश्नावली- (Pilot Study)

असंघटित विनापरवाना हमालांची सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्थिती अभ्यासणे-

सर्वेक्षणासाठी प्रश्नावली- (Pilot Study)

प्राथमिक माहिती-
  1. नाव-                   
  2. वय-
  3. जन्म आणि जन्मठिकाण-
  4. शिक्षण-
  5. जात-
  6. धर्म-
  7. साजरे करणारे सण/ उत्सव

सामाजिक, आर्थिक आणि मानसिक स्थिती अभ्यासण्यासाठी प्राथमिक स्वरूपाचा अभ्यासस -

१.       हमालीचा व्यवसाय किती वर्षापासून करत आहात ?
२.      हमाली व्यवसाय म्हणून निवडण्यामागचे कारण ?
३.      आत्तापर्यंत कोणत्या स्थानकांवर हमालीचे काम केलेले आहे ?
४.     हमालीच्या व्यवसायाव्यतीरिक्त कोणती इतर कामे करता ?
५.     हमालीच्या कामातील प्रतिदिन मिळकत किती ?
६.      केवळ हमालीच्या कामामध्ये कुटूंबाच्या गरजा भागवण्यासाठी पैसा पुरेसा ठरतो का ?
७.     हमालीचा व्यवसाय करताना समाजामधील स्थान किंवा समाजामधील वागणूक याबाबतचा काय अनुभव आहे ?
८.      हमालीच्या कामामध्ये रेल्वे अपघातादरम्यान जखमी/ मृत प्रवाशांना हाॅस्पिटलमध्ये नेण्याचे काम करताना कोणत्या अडचणी आहेत ?
९.      जखमी/ मृत प्रवाशांना हाॅस्पिटलमध्ये नेण्यासारखी कामे करताना कोणत्या प्रकारचा मानसिक ताण तणाव जाणवतो ?
१०.   स्ट्रेचर हमालीचे काम करताना प्रवाशाचे प्राण वाचवण्यासाठी यंत्रणा आणखी तत्पर आणि जलद करण्यासाठी तुम्हाला काय सुधारणा अपेक्षित आहेत किंवा यंत्रणेबाबत सल्ला द्याल ?







साहित्याचे पुर्निवलोकनाचा काही भाग....

The complex organization of the Collies, virtually excluded from state or enterprise social security schemes, is able to generate and reproduce a strong sense of social capital, reinforced through kin relations and ties with the village of origin.However the conditions under which these systems work and the prerequisites for building and maintaining trust and cooperation are very specific and therefore vulnerable.

Since the liberalization of the Indian Economy in 1991, the country has experienced economic prosperity and growth. This prosperity, however, is not yet accessible to the whole of the population. An increasing number of Indians are experiencing vulnerability, inequality & marginalization.( Muricken 1999:1)

By giving preference to neo-liberal policies and promoting economic growth, the government has neglected the social aspects of the everyday lives of many Indians. “Permanent and protected jobs in the organized sector are shrinking, hence even those with requisite skills are unable to find proper employment. For these people, work in informal sector is the only avenue for survival. (Bhowmik 2000:1) S a consequences, the size of urban informal economy has increased by a continuously stream of labourers who have migrated from the rural areas in search for a living in the city.

The informal economy has often been criticized for its poor employment conditions. As labour and social welfare laws do not cover the informal sector, wages and working conditions often fail to meet minimum requirements, resulting in long working hours, insecure employment, irregular incomes, lack of access to proper healthcare and old age or retirement benefits. Moreover the labourers work in often unhealthy, unsafe and unprotected working environments. The workers of the informal sector are generally considered the poorest workers in India and most exposed to shocks and stresses threatening their livelihoods. For their social welfare they are left to informal arrangements of instances, mutual help, and family assistance.

In recent years, however pressure on the state and civil society has increased and concern and attention is expressed to extend social security to the informal sector. It is widely recognized, however that covering these workers under social protection and benefits by the state is a difficult and expensive process. So far the majority of the unorganized workers of the economy remain uncovered. In this respect, it has been argued that the state should not aim to cover all risks and insecurities of the informal sector, but rather promote self regulation and enhance the performance of local systems of social security by enhancing workers social capital. (Conning and Kevane 2002 Dhanani and Islam 2002)
EPW May 29, 2004.
Railway Porters of Mumbai- Social Capital in Practice.
- Dennis Weitering, Gerben Nooteoom  



 EPW: Sept 25, 1999
Organising the Unorgnised : Case of Hamal Panchayat
-         Rajeshwari Deshpande


 Social groups working in the informal sectors as labourers are among the most neglected groups under the present pattern of capitalist development. The state does not acknowledge their presence, nor does the civil society accord them respectable status. Trade Unions too have mirrored this attitude and have by and large, failed to make efforts at organizing them.

The Hamal Panchayat is a successful attempt at mobilizing these workers and has been attempting to create a broad-based political alliance of unorganized workers and the poor forcing both the state and civil society to recognize their specific identities and acknowledge their contribution to the economy and society.

The concept and the extent of informal sector in the Indian Economy has been studied extensively (Papola 1980; Joshi and Joshi 1976; Chandra 1997). It is estimated that only 9.4% of the total Indian workforce belongs to the organized sector. (Datt 1997: 5) Among these the proportion of rural workers, mainly landless agricultural labourers still remain high. However during the last two decades changing economic policies and stagnation in agriculture have led to increased pace of urbanization and migration of people from rural and semi- urban areas to urban centres. (Bhattacharya 1998)This has resulted in subsequent growth of the Urban Informal sector.

In 1991, 20.7 per cent of the total workers were in urban areas. During the last 20 years the lopsided capitalist development also resulted in the disproportionate growth of the service sector in Indian Economy. (Kurien 1992: 341) Among the workers engaged in other services, in both rural and urban areas almost 59 per cent are unprotected.
 (Maniben Kara Institute 1994)

Trade Union activity in India on the other hand has largely focused workers belonging to the organized sector. It is very difficult to organize unorganized workers because of the absence of clear employer-employee relations, the scattered nature of workplaces, poor resource base of workers and neglect by the state. (Datt 1997: 5)

The Hamal Panchayat, a pune based Organization of the load carriers/ coolies is a glaring example of efforts at political mobilization within the informal sector. The Panchayat started its work in 1955. During the last 40 years it has helped the ‘hamals’ in Pune and many other parts of the state to lead a financially better and socially secure life.

Hamals or load carriers form a significant group of the urban unorganized workers engaged in service sector.

पुकार संशोधनासाठी वर्ष २०१०-११ साठी अॅडव्हान्स रिसर्च फेलोशीप अंतगर्त निवडलेल्या विषयासाठीचा अंतिम स्वरूपाचा प्रस्ताव

पुकार संशोधनासाठी वर्ष २०१०-११ साठी अॅडव्हान्स रिसर्च फेलोशीप अंतगर्त निवडलेल्या विषयासाठीचा अंतिम स्वरूपाचा प्रस्ताव

सारांश

मुंबई उपनगरीय लोकलसेवेदरम्यान अनेक प्रकारची कामे करणा-या असंघटीत कामगारांपैकी एक हमालांवर अभ्यास सदर संशोधनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असणार आहे. असंघटीत कामगार म्हणून काम करतानाच हमालीच्या व्यवसायातील (अर्थाजन) मोबदला, हमालाच्या व्यवसायाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोन, हमालीचा व्यवसाय करणा-या व्यक्तींची मानसिकता आदी बाबींचा अभ्यास सदर संशोधनाच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. सध्या भारतीय रेल्वेमध्ये अधिकृत हमाल म्हणून काम करणा-या हमालांच्या तुलनेत असंघटीत क्षेत्रात हमाल म्हणून काम करणा-यांना सेवा सुविधा, रोजगारातील मोबदला, कामातील मानसिक समाधान आणि सामाजिक प्रतिष्ठा आदी बाबींवर प्रकाश प्रशासकीय पातळीवर बदल घडवता
येतात काय यासाठीचा एक प्रयत्न सदर संशोधनाच्या माध्यमातून करण्याचा उद्देश ठेवूनच काम करण्यात येत आहे.

 संशोधनाच्या विषयाची ओळख -

मुंबई उपनगरीय लोकलच्या सेवेमध्ये अपघातांच्यानंतर अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या कामगारांच्या सामाजिक, आर्थिक पार्श्र्वभूमी आणि कामाच्या ठिकाणच्या मानसिकतेचा अभ्यास करणे या विषयावर संशोधन करण्याच्या उदिष्टाने सदर विषयावर साहित्याचे पुर्नविलोकन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

सदर विषयासाठी संशोधन करताना उपनगरीय लोकलच्या प्रवासादरम्यान होणारे अपघात काळजीपूर्वक अभ्यासण्य़ात आले. अपघाताची वेळ आणि प्रत्यक्षात जखमी प्रवाशाला हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी लागणारा वेळ पाहता अॅक्सीडंट हमालच एकमेव जीव वाचविणारी व्यक्ती त्यावेळी उपलब्ध असते ही गोष्ट प्रर्कषाने लक्षात आली.
मुंबई होणा-या दैनंदिन अपघातांची संख्या पाहता आणि गेल्या काही वर्षामधील अपघातांमध्ये मृत्यूमुखी आणि जखमी झालेल्यांची संख्येची पडताळणी केल्यानंतर, असे लक्षात येते की वेळीच उपचार आणि प्राथमिक वैद्यकीय सुविधा आणि मदत मिळाली असती तर अनेक प्रवाशांचे प्राण वाचले असते आणि त्याचप्रमाणे अनेकजण अपंग होण्यापासून वाचवता आले असते. मात्र रेल्वे प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी या कारभाराचा बळी ठरलेले आहेत.
भारतातीस बराचसा कामगार वर्ग हा असंघटीत आहे. त्यामुळेच तो शासकीय योजनांपासून दूर, वंचित आणि दुर्लक्षित राहिलेला आहे.
 रेल्वे स्थानकांवर ओझे आणि प्रवाशांचे सामान उचलणारा रेल्वे हमाल हा त्यापैकीच एक.
रेल्वे हमालांचे त्यांच्या कामाच्या स्थितीनुसार तीन वर्गामध्ये वर्गीकरण करता येईल,
- परवानाधारक हमाल
- विनापरवानाधारक हमाल
- झिरो पोलिस
नेहमीचे ओझे उचलण्याच्या कामासोबतच रेल्वे हमाल आणखी एक महत्वाचे काम करतात ते म्हणजे अपघातानंतर अपघाती जखमी व्यक्तीला नजीकच्या रूग्णालयामध्ये पोहचवण्याचे. म्हणूनच त्यांना अॅक्सींडट किंवा स्ट्रेचर हमाल म्हणून संबोधले जाते.
अपघातानंतर नजीकच्या रूग्णालयामध्ये पोहचवतानाच जखमी व्यक्तीला प्रथमोपचाराची मदत करण्याचे कामदेखील हे हमाल करतात.  

उपनगरीय लोकलच्या प्रवासादरम्यानच्या अपघातानंतर त्या प्रवाशाजवळ सर्वात पहिली कोणती व्यक्ती पोहचत असेल तर ती म्हणजे अॅक्सीडंट हमाल. एखाद्या अपघातानंतर स्टेशनमास्तरकडून सर्वप्रथम लोहमार्ग पोलिस आणि अॅक्सीडंट हमालाला अपघात झालेल्या ठिकाणाची माहिती देतात आणि त्यानंतर नजीकच्या हॅास्पिटलमध्ये त्या प्रवाशाला दाखल केले जाते ही सर्वसाधारण पद्धती. मात्र प्रवाशाच्या जीवाच्या किमतीच्या तुलनेत वेळीच मदत केलेल्या हमलाला केवळ तुटपुंज्या मानधनाच्या पैशांवरच समाधान मानावे लागते. जीवनाच्या किमतीच्या तुलनेत जीव वाचविण्यासाठी अपघातस्थळी पोहचणारा हमाल मात्र येथे जवळपास नगण्य किमतीचाच ठरतो.     
हमालाच्या मजुरीच्या तुलनेत लोकलच्या प्रवाशाच्या जीवाच्या महत्वाकडे लक्ष दिल्यास असे लक्षात येते की अपघातानंतर हमाली करणारा हा केवळ एक कामापुरता रेल्वे प्रशासन आणि प्रवासी यांच्यातील दुवा म्हणून मानला जातो. मात्र प्रत्यक्षात त्याच्या कामाचा मोबदला त्याठिकाणी योग्य प्रमाणात मिळत नाही ही वास्तविकता रेल्वेमार्फत देण्यात येणा-या मोबदल्यातून दिसून येते .
सदर हमालीच्या व्यवसायात काम करणारे आणि अपघातानंतर जखमी आणि मृत प्रवाशांचे देह उचलणारे अॅक्सीडंट हमाल मात्र कोणत्या जातीव्यवस्थेतून आलेले आहेत ? मुंबईसारख्या शहरामध्ये अशा प्रकारची कामे करण्यामागची नेमकी कारणे काय ? कोणत्या सामाजिक स्थरामधून हे हमाल अशा प्रकारचे काम करण्यासाठी येत असतात ?कोणत्या प्रकारची भाषा बोलतात ? कोणत्या भागातून अथवा जिल्हा, राज्यांमधून अशा प्रकारची कामे करण्यासाठी हे हमाल येत असतात ?कामाच्या बाबतीत एकमेकांमध्ये या हमालांचा संपर्क आणि ताळमेळ कसा असतो ? एखाद्या जखमी अवस्थेतील किंवा मृतावस्तेथील कोणतेही शरीर स्ट्रेचरच्या सहाय्याने उचलताना या व्यक्तींच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो ? या सर्व सामाजिक, आर्थिक आणि मानिसकतेशी संबंधित प्रश्नांची उकल सदर संशोधनातून करायची आहे.

स्ट्रेचर हमालांची सामाजिक स्थिती अभ्यासणे-
सामाजिक स्थिती अभ्यासताना जाती तसेच उपजाती, राहणीमान, मूळचे ठिकाण, कौटुंबिक स्थिती, शिक्षण, भाषा, साजरे केले जाणारे सण, उत्सव, समाजातील स्थान, सहभाग, सामाजिक सुरक्षा आदी भागांचा अभ्यास केला जाणार आहे.

आर्थिक स्थिती अभ्यासणे
स्ट्रेचर हमाल म्हणून काम करणा-या हमालांच्या रोजच्या उपजिविकेचे साधन काय ? रोजच्या कमाईतील नियमीतपणा आणि शाश्वती अभ्यासणे, दैनंदिन मिळकतीमधून कुटूंबाचा उदरनिर्वाह होतो का यासारख्या आर्थिक बाबी सदर संशोधनातून पडताळवायाच्या आहेत. किमान वेतन कायद्यानुसार या असंघटीत क्षेत्रातील हमालांना रोजगार मिळतो काय हे अभ्यासणे.

हमालांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करणे
मुंबई उपनगरीय लोकलसेवेच्या रोजच्या कामकाजात जखमी व्यतीच्या तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या सहवासात राहून मानसिकतेवर काही परिणाम होतो काय ही स्थिती अभ्यासणे. अशा कामांमध्ये मानसिक तणाव किंवा त्याचे वेगळे परिणाम होतात काय याचा अभ्यास करणे.

संशोधनाचा प्रश्न  मुंबईसारख्या शहरामध्ये अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या अॅक्सीडंट हमाल या कामात सामाजिक स्थर, आर्थिक बाबींसोबतच कोणत्या मानसिकतेमध्ये काम करावे लागते ? या वास्तविकतेचा अभ्यास करणे.  

संशोधनाचे ध्येय  मुंबई उपनगरीय लोकल सेवेत काम करणा-या अॅक्सींडट हमालांचा अभ्यास करणे.

संशोधनाचे उदिष्ट 
अॅक्सीडंट हमालांच्या विषयावर आत्तापर्यंतचे खूपच मर्यादित संशोधन झाले आहे हे साहित्याच्या पुर्निवलोकनासाठी घेतलेल्या प्राथमिक अभ्यासातून चित्र समोर आलेले आहे. संशोधन हे शोध स्वरूपातील असल्याने सदर संशोधनासाठी गृहितकांचा वापर न करण्याचे ठरविण्यात आलेले आहे.

१.      मुंबईसारख्या शहरामध्ये अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणार-या व्यक्तींचा सामाजिक स्थर आणि समाजात असणारे अभ्यासणे.
२.    अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या व्यक्तींच्या मजदुरीच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करणे.
३.    अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करताना त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अभ्यासणे.

संशोधनाची पद्धत 
सदर संशोधनासाठी शोध स्वरूपाच्या (exploratory) स्वरूपातील संशोधन पद्धती अवलंबली आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धतीने संशोधन करण्यात येणार आहे. संशोधनाचा मर्यादित कालावधी पाहता सदर संशोधनामध्ये गुणात्मक पद्धतीने संशोधन करताना ठराविक हमालांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. हमाल म्हणून १०  वर्षे काम करण्याचा अनुभव असणा-यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.

संशोधनाचा कालावधी 
सदर संशोधनासाठी मुंबई उपनगरीय लोकलच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गावरील अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-यांचा अभ्यास संख्यात्मक आणि गुणात्मक स्वरूपाचे संशोधन करून करण्यात येणार आहे. संशोधनासाठी असणारा मर्यादित ११ महिन्यांचा उपलब्ध कालावधी पाहता सदर संशोधनासाठी तिन्ही मार्गावरील ठराविक स्टेशनवरील अॅक्सीडंट हमालांचा अभ्यास करण्यात येणार आहे. संशोधनाच्या उपलब्ध कमी कालावधीमुळे मुलाखतीसाठी उपलब्ध असणारा कमी कालावधी ही संशोधनाची मर्यादा ठरू शकते.   



रिटा सावला यांच्यासोबत मुलाखत

फिजीशीयन आणि सामाजिक कार्यकर्त्या रिटा सावला यांची मुलाखत -

राधी फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबईतील अनेक सामाजिक समस्यांवर कार्यरत असणा-या डाॅ. रिटा सावला यांच्याशी मुंबईतील असंघटीत कामगारांच्या हमालीच्या व्यवसायाबाबत चर्चा करताना अनेक मुद्दयांवर वेगवेगळी मतांच्या आधारे पुकारसाठी संशोधनाचा विषय समजून घेण्यासाठी मदत झाली.
रिटा सावला यांनी असंघटीत कामगारांसोबत विशेषतः उपनगरीय लोकल सेवेमध्ये हमाल म्हणून काम करणा-या व्यक्तींसोबत आयोजित केलेल्या कार्यशाळेमुळे सदर विषयाबाबत तपशीलवार माहिती मांडताना रिटा सावला यांनी हमालांच्याबाबतीत अनेक सामाजिक आणि मानसिक परिणांमांचा अभ्यास समोर मांडला.
मार्च 2010 मध्ये सावला यांनी पशि्चम रेल्वेच्या वांद्रे ते दहीसर या उपनगरीय रेल्वे स्टेशनदरम्यान अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या व्यक्तींसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेदरम्यान अपघाती व्यक्तींना हाताळण्याची पद्धत, प्रथमोपचार देण्याची पद्धती यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले. त्याचसोबत रेल्वे पोलिस आणि स्टेशन मास्टर यांनादेखील याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. चर्चासत्राच्या कालावधीदरम्यान सावला यांनी हमलांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्या जाणून घेतल्या.

सद्यस्थितीला हमलांची दोन प्रकारांमध्ये वर्गवारी होते.
1.     परवानाधारक हमाल
2.     विनापरवानाधारक हमाल


रेल्वेच्या परवानाधारक हमालांना निशि्चत हमालीसाठीची रक्कम वैद्यकीय सुविधा तसेच रेल्वेकडून सुविधा मिळत असतात. मात्र विनापरवानाधारक हमालांसाठीचे हमालीचे पैसे निश्चित नसतात. तसेच कोणतीही सेवासुविधा यांच्यासाठी रेल्वेकडून उपलब्ध नसते असे सावला यांनी स्पष्ट केले.
विनापरवानाधारकांच्यासाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र अशी श्रेणी नसते. मात्र अपघाती व्यक्तींना जखमी अथवा मृतावस्थेत उपचारासाठी दाखल करताना त्यामोबदल्यात मिळणारी रक्कम मात्र तुटपूंजी असे सावला म्हणाल्या. सद्यस्थितीला अॅक्सीडंट हमालांसाठी देण्यात येणारी रक्कम हायकोर्टाच्या आदेशामुळे वाढविण्यात आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी रेल्वेकडून सध्या १०० रूपये मोजण्यात येतात.
हमालीच्या व्यवसायामध्ये काम करणा-या सर्वच हमालांना अॅक्सींडंट झालेल्या प्रवाशांना किंवा व्यक्तींना उपचारासाठी पोहचविण्याचे काम जमते असे नाही. काही हमाल अशा प्रकारचे काम करतही नाहीत असे सावला म्हणाल्या. मात्र अनेकांना अपघातानंतर जखमींना वेळीच उपचार देण्याचे आणि उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये पोहचवण्याचे काम म्हणजे देवाच्या दुताचे काम केल्यासारखे वाटते.

सावला यांनी आपल्या कार्यशाळेच्या अनुभवातून आपले मत व्यक्त करताना असे स्पष्ट केले की या हमालांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्याचप्रमाणे या हमालांना अपघाती व्यक्तींना हाताळण्याचे ज्ञानही नसते. त्याहून महत्वाचे म्हणजे अनेक स्टेशनवर अशा प्रकारचे अपघाताच्या वेळी मदत करणारे हमालदेखील हजर किंवा उपलब्ध नसतात. उपचारासाठी आवश्यक प्रथमोपचार पेटी तसेच हमालांसाठी ग्लव्जची व्यवस्थादेखील नसते. हायकोर्टाच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शकानुसार रेल्वेकडून अमलबजावणी करण्यात येते.
सद्यस्थितीला हमालांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करताना असे जाणवते की अनेक हमाल हे स्थलांतर करूनच मुंबईसारख्या शहरामध्ये रोजगाराच्या शोधात येतात. या हमालांसाठी राहण्याच्या ठिकाणाची व्यवस्था आणि शिधा वाटप पुस्तिका अशा प्रकारच्या कोणत्याही सोयीसुविधांची उपलब्धतता नसते. अशिक्षितपणा, रोजगाराच्या पैशांची बचत तसेच कोणत्याही प्रकारची हमखास रोजगाराची शाश्वती नसते. सर्वात मोठी अडचण म्हणजे असंघटीत असल्या कारणामुळे त्यांची संख्या आणि शक्य उपाययोजना, सुविधा यांचा ताळमेळ घालणे अशक्य होते.


आरोग्याबाबतच्या अडचणी
वारंवार ओझी उचलण्याचे काम आणि त्यामुळे जाणवणारा पाठीचा त्रास त्याचप्रमाणे व्यसने यासारख्या सवयींतून आरोग्याच्या तक्रारीदेखील वारंवार भेडसावत असतात. हमालांच्या कुटूंबातदेखील लहान मुलांना कुपोषणासारख्या समस्या भेडसावतात. अनेकवेळा वैद्यकीय उपचारापेक्षा अंधश्रद्धेपोटी उपचारांमध्ये टाळाटाळ होत असते.