Saturday, October 30, 2010

रिटा सावला यांच्यासोबत मुलाखत

फिजीशीयन आणि सामाजिक कार्यकर्त्या रिटा सावला यांची मुलाखत -

राधी फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबईतील अनेक सामाजिक समस्यांवर कार्यरत असणा-या डाॅ. रिटा सावला यांच्याशी मुंबईतील असंघटीत कामगारांच्या हमालीच्या व्यवसायाबाबत चर्चा करताना अनेक मुद्दयांवर वेगवेगळी मतांच्या आधारे पुकारसाठी संशोधनाचा विषय समजून घेण्यासाठी मदत झाली.
रिटा सावला यांनी असंघटीत कामगारांसोबत विशेषतः उपनगरीय लोकल सेवेमध्ये हमाल म्हणून काम करणा-या व्यक्तींसोबत आयोजित केलेल्या कार्यशाळेमुळे सदर विषयाबाबत तपशीलवार माहिती मांडताना रिटा सावला यांनी हमालांच्याबाबतीत अनेक सामाजिक आणि मानसिक परिणांमांचा अभ्यास समोर मांडला.
मार्च 2010 मध्ये सावला यांनी पशि्चम रेल्वेच्या वांद्रे ते दहीसर या उपनगरीय रेल्वे स्टेशनदरम्यान अॅक्सीडंट हमाल म्हणून काम करणा-या व्यक्तींसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेदरम्यान अपघाती व्यक्तींना हाताळण्याची पद्धत, प्रथमोपचार देण्याची पद्धती यासारख्या गोष्टींचे प्रशिक्षणदेखील देण्यात आले. त्याचसोबत रेल्वे पोलिस आणि स्टेशन मास्टर यांनादेखील याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. चर्चासत्राच्या कालावधीदरम्यान सावला यांनी हमलांच्या सामाजिक आणि आर्थिक समस्या जाणून घेतल्या.

सद्यस्थितीला हमलांची दोन प्रकारांमध्ये वर्गवारी होते.
1.     परवानाधारक हमाल
2.     विनापरवानाधारक हमाल


रेल्वेच्या परवानाधारक हमालांना निशि्चत हमालीसाठीची रक्कम वैद्यकीय सुविधा तसेच रेल्वेकडून सुविधा मिळत असतात. मात्र विनापरवानाधारक हमालांसाठीचे हमालीचे पैसे निश्चित नसतात. तसेच कोणतीही सेवासुविधा यांच्यासाठी रेल्वेकडून उपलब्ध नसते असे सावला यांनी स्पष्ट केले.
विनापरवानाधारकांच्यासाठी कोणत्याही प्रकारची स्वतंत्र अशी श्रेणी नसते. मात्र अपघाती व्यक्तींना जखमी अथवा मृतावस्थेत उपचारासाठी दाखल करताना त्यामोबदल्यात मिळणारी रक्कम मात्र तुटपूंजी असे सावला म्हणाल्या. सद्यस्थितीला अॅक्सीडंट हमालांसाठी देण्यात येणारी रक्कम हायकोर्टाच्या आदेशामुळे वाढविण्यात आलेली आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी रेल्वेकडून सध्या १०० रूपये मोजण्यात येतात.
हमालीच्या व्यवसायामध्ये काम करणा-या सर्वच हमालांना अॅक्सींडंट झालेल्या प्रवाशांना किंवा व्यक्तींना उपचारासाठी पोहचविण्याचे काम जमते असे नाही. काही हमाल अशा प्रकारचे काम करतही नाहीत असे सावला म्हणाल्या. मात्र अनेकांना अपघातानंतर जखमींना वेळीच उपचार देण्याचे आणि उपचारासाठी हाॅस्पिटलमध्ये पोहचवण्याचे काम म्हणजे देवाच्या दुताचे काम केल्यासारखे वाटते.

सावला यांनी आपल्या कार्यशाळेच्या अनुभवातून आपले मत व्यक्त करताना असे स्पष्ट केले की या हमालांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिले जात नाही. त्याचप्रमाणे या हमालांना अपघाती व्यक्तींना हाताळण्याचे ज्ञानही नसते. त्याहून महत्वाचे म्हणजे अनेक स्टेशनवर अशा प्रकारचे अपघाताच्या वेळी मदत करणारे हमालदेखील हजर किंवा उपलब्ध नसतात. उपचारासाठी आवश्यक प्रथमोपचार पेटी तसेच हमालांसाठी ग्लव्जची व्यवस्थादेखील नसते. हायकोर्टाच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शकानुसार रेल्वेकडून अमलबजावणी करण्यात येते.
सद्यस्थितीला हमालांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा अभ्यास करताना असे जाणवते की अनेक हमाल हे स्थलांतर करूनच मुंबईसारख्या शहरामध्ये रोजगाराच्या शोधात येतात. या हमालांसाठी राहण्याच्या ठिकाणाची व्यवस्था आणि शिधा वाटप पुस्तिका अशा प्रकारच्या कोणत्याही सोयीसुविधांची उपलब्धतता नसते. अशिक्षितपणा, रोजगाराच्या पैशांची बचत तसेच कोणत्याही प्रकारची हमखास रोजगाराची शाश्वती नसते. सर्वात मोठी अडचण म्हणजे असंघटीत असल्या कारणामुळे त्यांची संख्या आणि शक्य उपाययोजना, सुविधा यांचा ताळमेळ घालणे अशक्य होते.


आरोग्याबाबतच्या अडचणी
वारंवार ओझी उचलण्याचे काम आणि त्यामुळे जाणवणारा पाठीचा त्रास त्याचप्रमाणे व्यसने यासारख्या सवयींतून आरोग्याच्या तक्रारीदेखील वारंवार भेडसावत असतात. हमालांच्या कुटूंबातदेखील लहान मुलांना कुपोषणासारख्या समस्या भेडसावतात. अनेकवेळा वैद्यकीय उपचारापेक्षा अंधश्रद्धेपोटी उपचारांमध्ये टाळाटाळ होत असते.  
   











No comments:

Post a Comment