Friday, May 27, 2011

निष्कर्ष


निष्कर्ष


  परवानाधारक हमालांसारखाच सामाजिक दर्जा, आर्थिक मिळकत आणि कामाच्या ठिकाणी मानसिक समाधान मिळावे यासाठी स्ट्रेचर हमालांचीही धडपड आहे. परवान्याशिवाय काम करण्यापेक्षा मुंबई उपनगरीय रेल्वे स्टेशनला त्यांच्या स्ट्रेचर हमालीच्या कामाला तितकेच महत्व आणि अधिकृतता मिळावी यासाठी स्ट्रेचर हमालांचा प्रयत्न आहे. एकूणच रेल्वेसाठी आणि समाजासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या स्ट्रेचर हमालांचा संपूर्ण यंत्रणेत कुठेच अधिकृत समावेश नाही ही खंत आहे. 

संशोधनातून समोर आलेल्या बाबी


  • संशोधनातून समोर आलेल्या बाबी
  •         स्ट्रेचर हमाल म्हणजे रेल्वे अपघातानंतर रेल्वे स्थानक प्रबंधक आणि गर्व्हनमेंट रेल्वे पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली, अपघाती – जखमी व्यक्तीला किंवा प्रवाशाला अपघात स्थळापासून उचलून रुग्णालयापर्यंत पोहचवणारी व्यक्ती किंवा रेल्वे स्थानकावरील उपलब्ध हमाल होय. गरज पडल्यास जखमी व्यक्तीवर प्रथमोपचार करण्याचे कामदेखील स्ट्रेचर हमाल करत असतात.    
  •    स्ट्रेचर हमालांमधील व्यसनाचे प्रमाण हा एक चिंतेचा विषय दिसून येतो. रोजच्या मिळकतीपैकी बराचसा पैसा हा व्यसनावर खर्च केला जातो हेदेखील संशोधनादरम्यान निदर्शनास आले.
  •      कांजुरमार्ग स्थानकावर एक महिला स्ट्रेचर हमाल जवळपास १० वर्षे काम करत असल्याची माहिती मिळाली.
  •     मुंबईत उपनगरीय रेल्वेत साखळी स्फोटांच्या कालावधीतही स्ट्रेचर हमालांनी   काम केल्याचे सर्वेक्षनात आढळून आले. बऱ्याच हमालांनी या घटनेनंतर च्या मदतकार्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले.

·        रेल्वेच्या अपघातात एखाद्या जखमी प्रवाशावर उपचार तसेच त्याच्या जखमेची गंभीरता तपासण्याचे कौशल्य स्ट्रेचर हमालांकडे आहे. तसेच स्ट्रेचर हमाल एखाद्या अपघातानंतर जखमी व्यक्तीच्या जखमेची तीव्रता पाहून तो जीवंत राहू शकेल का याचा अंदाज ब-याचदा अचूक घेतात. अपघाती व्यक्तीची परिस्थिती पाहून स्ट्रेचर हमाल सदर व्यक्तीचा अपघात कसा झाला असावा उदा. आत्महत्या, धावत्या रेल्वेतून पडला, रेल्वे रूळ ओलांडताना अपघात घडला इ. चा अंदाज घेतात.

कामाचे तास आणि आरोग्याची काळजी


     दिवसापोटी काम करणा-यांमध्ये ७ ते १२ तास काम करणा-यांची संख्या सर्वाधिक आहे. एकूण ४८.७२ टक्के हमाल दिवसाला सात तासांहून अधिक काम करतात. तसेच ६ तासांपर्यंत काम करणा-यांची टक्केवारी ही १२.८२ इतकी आहे, तर १२ तासांपेक्षा अधिक काम करणा-यांमध्ये ३८.४६ टक्के हमालांचा समावेश होतो. विशेष म्हणजे जे स्ट्रेचर हमाल स्थानकावरच राहतात त्या हमालांची संख्या १२ तासांहून अधिक काम करणा-यांमध्ये आहे. 


आरोग्याची काळजी


स्ट्रेचर हमालीचे काम करताना जवळजवळ ४९% हमाल हे वैयक्तीक काळजीकडे दुर्लक्ष करतात, म्हणजेच ग्लोवज इ. साधनांचा वापर त्यांच्याकडून केला जात नाही. तर ३१% हमाल हे स्वत:हून तर उरलेले २०% हमाल हे रेल्वेद्वारे मिळणाऱ्या सुविधांचा लाभ घेतात.

मासिक उत्पन्न आणि मासिक बचत

स्ट्रेचर हमालीचे काम करणाऱ्या हमालांमध्ये बहुतांश लोकांचे मासिक सरासरी उत्पन्न ३००० रुपये ते ४५०० रुपयांच्या दरम्यान आहे, त्यामध्ये एकूण ३०.७७ टक्के हमालांचा समावेश होतो, ४५०० ते ६००० रुपये कमावणा-या हमालांची संख्या ही २८.२० टक्के तर सहा हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे कमावणारे हमाल २७.३५ टक्के इतके आहेत. तीन हजार पर्यंत मासिक उत्पन्न असणारे हमाल १३.६८ टक्के इतके आहेत.




मिळालेला पैसा बचत न करणा-यांचे प्रमाण मोठे आहे. एकूण ५८.९७ टक्के हमाल पैशांची बचत करत नाहीत. तसेच ५०० रुपयांपर्यंत बचत करणारे एकूण १३.६७ टक्के हमाल आहेत. तर १००० रुपयांची बचत करणारे ८.५५ टक्के हमाल आहेत. हजार रुपयांपेक्षा जास्त बचत करणा-यांची संख्या ही १८.८० टक्के इतकी असल्याचे दिसून आले. 


स्ट्रेचर हमालांची निवास स्थिती आणि धर्मनिहाय संख्या

४२% स्ट्रेचर हमाल हे स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात, २६% लोक भाड्याच्या घरात राहतात, १६.२४% हमाल हे रेल्वेलगतच्या  झोपडपट्टीत तर उर्वरित १६.२४% हमाल हे रेल्वे स्थानकावरच आपले वास्तव्य करतात.



४२% स्ट्रेचर हमाल हे स्वतःच्या मालकीच्या घरात राहतात, २६% लोक भाड्याच्या घरात राहतात, १६.२४% हमाल हे रेल्वेलगतच्या  झोपडपट्टीत तर उर्वरित १६.२४% हमाल हे रेल्वे स्थानकावरच आपले वास्तव्य करतात.




स्ट्रेचर हमालांमधील शैक्षणिक स्थिती आणि स्थलांतर

स्ट्रेचर हमालांमधील शैक्षणिक स्थिती
                       
एकूण संख्येच्या फक्त ५१% हमालच शिक्षित असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले, तसेच शिक्षित हमालांपैकी बहुतांश हमालांनी फक्त प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे.  



            स्ट्रेचर हमालीचे काम करणा-यांमध्ये महाराष्ट्र राज्याबाहेरुन आलेल्यांची संख्या अधिक आहे. हमालांच्या एकूण संख्येपैकी ४७ टक्के हमाल हे राज्याबाहेरुन केवळ रोजगारासाठी मुंबईत आले अशी माहिती सर्वेक्षणातून मिळाली. राज्याअंतर्गत रोजगाराच्या शोधात स्थलांतर करणा-यांची संख्या ही २८ टक्के तर मुलत: मुंबईत असणा-यांची संख्या ही २४ टक्के इतकी असल्याचे सर्वेक्षणातून लक्षात येते.  












रेल्वे स्थानकनिहाय स्ट्रेचर हमालांची संख्या – प. रेल्वे


रेल्वे स्थानकनिहाय स्ट्रेचर हमालांची संख्या - मध्य रेल्वे



संशोधनादरम्यानचे अनुभव


संशोधनादरम्यानचे अनुभव
·        सदर विषयावर संशोधन करताना स्ट्रेचर हमालांना त्यांच्याबद्दल माहिती विचारणारे पहिले आम्हीच होतो तसेच इतक्या वर्षांच्या त्यांच्या कामामध्ये त्यांच्याबद्दल विचारपूस करणारे आम्हीच असल्याने त्यांच्याकडून आम्हाला या संशोधनासाठी उत्तम सहकार्य लाभले. त्यांनी सर्वेक्षणादरम्यान स्वतः आणि आपल्या सहकाऱ्यांना सहभागी करुन घेतले. 
·        रेल्वे स्ट्रेचर हमाल जखमी/ मृत व्यक्तीला उचलताना वैयक्तिक काळजीकडे कसे दुर्लक्ष करतात याचा अनुभव विक्रोळी रेल्वे स्थानकावर १३ मे २०११ रोजी दुपारी २ वाजता घडलेल्या रेल्वे अपघातानंतर आला. अपघातामध्ये त्या व्यक्तीचे दोन्ही पाय शरीरापासून वेगळे झाले होते. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीला उचलून रेल्वे स्थानक प्रबंधकाच्या कार्यालयाजवळ आणताना तसेच पंचनामा करण्यासाठी संपूर्ण शरीराची तपासणी करताना त्या स्ट्रेचर हमालाने कोणत्याही प्रकारची वैयक्तीक काळजी (ग्लोव्हज् इ.) घेतली नव्हती.

संशोधनासाठी निवडण्यात आलेला नमुना (sample)


संशोधनासाठी निवडण्यात आलेला नमुना (sample)
     मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांदरम्यान स्ट्रेचर हमाल म्हणून काम करणाऱ्या  हमालांचे या संशोधनासाठी सर्वेक्षण करताना १२० नमुन्यांचे  (sample) उदिष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी ११७ जणांचे सर्वेक्षण करण्यात यश आले.
मध्य रेल्वेची पुढील स्थानके नमुन्यादाखल घेण्यात आली आहेत –(नमुन्यांची संख्या ४३) :
छत्रपती शिवाजी टर्मिनस, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडूप, ठाणे.
पश्चिम रेल्वेची पुढील स्थानके नमुन्यादाखल घेण्यात आली आहेत –(नमुन्यांची संख्या ७४):
मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे टर्मिनस, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली  बोरिवली.

Saturday, February 26, 2011

Suggestions from Prof. Chandrasheel Tambe ( CHM College, Ulhasnagar)

We (Kiran & Sanjay) discussed the Research Topic (Socio, Economic & Psychological Study of Railway Stretcher Hamals) with Prof. Chandrasheel Tambe. He Suggested few points:


1) Draft the entire proposal in English to get larger audience.
2) Conduct Survey at all the suburban railway stations of  Mumbai to notify the number Railway Stretcher   Hamals working for railway at suburban railway stations , who are not recognised by the railway administration.
3) Collect all the demographic & Socio-economic information of Railway Stretcher Hamals through Survey.
4) Conduct the study with the aim of Policy making Study.
5) Ask Health Related Questions to Railway Stretcher Hamals while interviewing them.
6) Focus only on Socio, Economic & Psychological Study of Railway Stretcher Hamals & do not deviate to other issues of Railway.

Friday, February 18, 2011

जीवनवाहिनी बनली मृत्यूवाहिनी


गेल्या चार वर्षांत रेल्वे अपघातात १५ हजार १९५ 
जणांनी गमावले प्राण

सर्वाधिक अपघाताची ठिकाणे व अपघाताची संख्या (५ वर्षांतील)

कोपरी पूल (५८३)
दिवा ते कोपर स्थानकादरम्यान (५११)
ठाणे स्थानक (४३२)
विरार स्थानक (३५२)
वडाळा ते जीटीबीनगर स्थानकादरम्यान (३३३)
गोरेगाव स्थानक (२८४)
चेंबूर स्थानक (२७९)
कोपर ते डोंबिवली (२५७)

सहा वर्षांतील सर्वाधिक अपघाती मृत्यूंची नोंद करणारे पोलीस ठाणे

कुर्ला (५६४७)
मुंबई (३५०४)
वसई रोड (३३५९)
ठाणे (३१२४)
कल्याण (२८९५)
वांद्रे (२४९५)
बोरिवली (२३०६)

सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेतर्फे अनेक मोहिमा राबवूनही गेल्या चार वर्षांत मुंबईतील रेल्वे अपघातात १५ हजार १९५ लोकांनी विविध कारणास्तव आपला जीव गमावला आहे. रेल्वे पोलिसांनी उपलब्ध केलेल्या माहितीवरून ही बाब उघड झाली असून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहे.


पादचारी पुलाचा वापर न करता रेल्वे रुळ ओलांडणे, भरगच्च भरलेल्या लोकलमधून तोल जाऊन खाली पडणे किंवा हिरोगिरीकरण्याच्या नादात खाली पडणे अशा विविध कारणास्तव गेल्या चार वर्षांत १५ हजार १९५ प्रवाशांनी आपला जीव नाहक गमावला आहे. या आकडेवारीवरून मुंबईकर कशाप्रकारे रेल्वे पोलिसांकडून सुरक्षित प्रवासासाठी राबविल्या जाणाऱ्या मोहिमांकडे दुर्लक्ष करून स्वत:चा जीव धोक्यात घालतात हेच दिसते. गेल्या वर्षी तीन हजार ७१० अपघाती मृत्युंमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना दोन हदार १५२, रेल्वे फलाटाच्या गॅपमध्ये पडून सहा, चालू गाडीतून पडून ७३४ आणि चालू गाडीतून प्रवास करीत असताना रेल्वे पोलला धडकून १३ व इतर कारणाने ७९६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांना आळा घालण्यातील अडचणी मुंबईची लोकसंख्या वाढण्यासोबत लोकलमधील गर्दी दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. ही बाब लक्षात घेऊन स्थानकांची संख्या वाढली आहे, रेल्वेचा आवाका वाढला आहे. एवढेच नव्हे, तर लोकल अपघात, गुन्हेगारी यांना आळा घालण्यात रेल्वे पोलिसांना मनुष्यबळ व साधनसामुग्री अभावी अडचण येत आहे. सुमारे ७० लाख मुंबईकर लोकलमधून प्रवास करतात. मध्य रेल्वेवर ९१ स्थानके व चार टर्मिनस आहेत, तर पश्चिम रेल्वेवर ३८ स्थानके व दोन टर्मिनस आहेत. रेल्वेच्या या आवाक्यावर देखरेख ठेवण्यासाठी अवघी साडेतीन हजार रेल्वे पोलिसांची फोर्स कार्यरत आहेत.


 वास्तविक रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलीस यांनी एकत्रितपणे ही जबाबदारी सांभाळणे अभिप्रेत आहे. मात्र दोन्ही यंत्रणांमध्ये दुजाभाव असून त्यातून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या मोहिमा अपयशी ठरत आहेत. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी हमाल, स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी तसेच रुग्णवाहिकांची मागणी केली आहे. मात्र अद्याप ती पूर्ण झालेली नाही. हातावर मोजण्याएवढय़ाच स्थानकांवर या सोयी उपलब्ध आहेत. अपघातानंतर अनेकदा व्यक्ती वेळेत मदत न मिळाल्यामुळे मृत्युमखी पडते. त्यातही रुग्णवाहिका वेळेत न आल्याने ही परिस्थिती उद्भवते, असे अनेक प्रकरणांतून उघड झालेले आहे. वास्तविक मध्य रेल्वेवरील केवळ नऊ, तर पश्चिम रेल्वेवरील केवळ चार स्थानकांत रुग्णवाहिका उपलब्ध आहेत.     

दहशतवादी ‘टार्गेट’वर अन् प्रवासी वा-यावर !


कैलास कोरडे / प्राजक्ता कद

सीएसटी स्थानकावरील २६/११ च्या हल्ल्यापासून रेल्वे, लोहमार्ग पोलीस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दल या तिघांनीही केवळ दहशतवाद्यांना निशाण्यावर ठेवले आहे. उपनगरी लोकलने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना जणू केवळ दहशतवादी कारवाया वगळता अन्य कोणत्याही गोष्टींपासून धोका नाही, अशा समज करून घेत या त्रयींनी लाखो प्रवाशांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. 

कसाब व त्याचा साथीदार इस्माईल या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सीएसटी स्थानकावर हल्ला केल्यापासून रेल्वे, जीआरपी आणि आरपीएफच्या अजेंडय़ावर केवळ दहशतवादी कारवाया रोखण्यासाठीच्या उपायोजना आहेत. प्रवासी सुरक्षेच्या मुद्दा उपस्थित करताच दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी सर्वसमावेश सुरक्षा योजना आखण्यात आली आहे, असे उत्तर दिले जाते. दहशतवादविरोधी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर, अमूक प्रकारच्या रायफल, तमूक प्रकारचे एक्सरे बॅगेज स्कॅनर खरेदी करणार असल्याची माहिती दिली जाते. मात्र दोन वर्षे उलटली तरी सर्वसमावेशक सुरक्षा योजनेच्या नावाखाली केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत आणि उपनगरी प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला क्रूर खेळ तसाच पुढे सुरू आहे. 

सुरक्षेच्या नावाखाली प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कशी हेळसांड होत आहेत, याबाबतही अनेक उदाहरणे देता येतील. अंधाराचा फायदा घेऊन दरवाजात उभ्या असलेल्या मंडळींच्या हातावर फटका मारून मोबाईल मारणाऱ्यांचा लाखो प्रवाशांनी अक्षरश: धसका घेतला आहे. अनेक प्रवाशांनी आपले मोबाईल गमावले आहेत. मात्र सर्वात गंभीर बाब म्हणजे ठराविक पद्धतीने होणारी ही मोबाईल चोरी आजवर अनेकांच्या जीवावर बेतली आहे. विशेषत: अनेक महिलांना या चोरीमुळे जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक प्रवासी जायबंदी झाले आहेत.
प्रवाशांच्या जीवाला घोर लावणाऱ्या या प्रकाराबद्दल पोलीस किंवा रेल्वे यंत्रणेला काहीएक सोयरसुतक नाही. दरवाजातील प्रवाशांचे मोबाईल मारणाऱ्या किती चोरांना आजवर पकडण्यात आले आणि त्यापैकी किती जणांविरुद्ध न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला? याबाबतची माहिती जीआरपीने जाहीर केल्यास प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत संबंधित यंत्रणा किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होईल. हा प्रकार रेल्वेच्या कानी घातला की तो सुरक्षेशी संबंधित मुद्दा असल्याचे सांगून रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी जीआरपी- आरपीएफवर ढकलते. आरपीएफकडे विचारणा केल्यास, ‘आमचे काम केवळ रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षाकरणे इतकेच असल्याचे सांगितले जाते. लोहमार्ग पोलीस कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी नाकारत नसले तरी आपल्यादृष्टीने दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याला सर्वोच्च प्राधान्यअसल्याचेच ते सांगतात. अशावेळी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणाला जबाबदार धरायचे हा प्रश्न अधांतरीच आहे.

काही दिवसांपूर्वी टपोरींच्या मुद्दय़ावर विचारता, जीआरपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक राज खिलनानी यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचे जाहीर वक्तव्य करून उपस्थितांना धक्काच दिला. टपोरींचे अपघात तर अपघातात मोडतच नाही. ती तर आरपीएफची जबाबदारी ठरते. त्यामुळे आमचा या समस्येशी काहीच संबंध नाही, असा दावा खिलनानी यांनी केला. त्यांच्या वक्तव्यावर टीकेचा सूर निघाल्यावर त्याबाबतचे स्पष्टीकरण देताना त्यांनी दावा केला की, रेल्वे पोलिसांचे काम हे कायदा आणि सुव्यवस्थेची घडी नीट ठेवणे आहे. ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार पाडत आहोत. आमच्यापुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे दहशतवादी हल्ल्यांना प्रतिबंध करणे हे आहे. त्यामुळे भविष्यात असे हल्ले झाले, तर ते रोखण्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत. त्यावर लक्ष केंद्रीत करणे आमची पहिली प्राथमिकता आहे. खिलनानींनी हे स्पष्टीकरण दिले असले तरी अशा घटनांची नोंद रेल्वे पोलीस अपघाती मृत्यूम्हणूनच करतात हे वास्तव आहे.