Saturday, February 12, 2011

पुकार @ Six..............


PUKAR @ six…
 
संशोधनासारखी आवडीची गोष्ट पुकारसोबत शिकायला तसेच प्रत्यक्ष करायला मिळतेय ते पण दुस-यांदा हा आयुष्यातील एक चांगला अनुभव आहे. पुकार अॅडव्हान्स युथ फेलोशिप 2010-11 साठीची मुलाखत ते आतापर्यंत सहा महिन्यांचा कालावधी उलटलाय. हा प्रवास म्हणजेच संशोधन विषय निवड ते माहिती संकलन यादरम्यानचा प्रवास असला तरीही दरम्यानच्या काळात कित्येक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. तसेच नवीन लोकांना भेटण्याचा योग आला. त्याचा करियरमध्ये विशेषतः सदर संशोधनासाठीदेखील नक्कीच फायदा होणार आहे.

Orientation workshop    

पुकारच्या AYF WORKSHOP हे सर्वांसाठीच प्राथमिक ओळख करून देण्यासोबतच एक दिशा देणारे होते. त्यादरम्यान मिलिंद मोरजकरसारखा उत्साही मार्गदर्शक आम्हाला लाभला. ८ आणि २५ अॉगस्ट रोजी झालेले वर्कशॉपने आमच्या संशोधनाला एक नवान दिशा मिळाली. तसेच ब-याच नवीन गोष्टींचे आकलन करणेदेखील आम्हाला शक्य झाले.

What is research?
What are steps to do research?
How to from research question?
Role of literature review in research.
Use of Technology.

पहिल्या वर्कशॉपदरम्यान झालेले मिलिंद सरांचे सर्वच सेसन्स हे खुपच उपयुक्त आणि प्रभावी होते. विशेषतः सांघिक कौशल्य, साहित्याचे पुर्नविलोकन, संशोधनादरम्यान तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या सत्रांनी संशोधनाच्या प्रक्रीयेसाठी महत्वाची भूमिका पार पाडली. सुनिलचा सुरूवातीला असणारा उत्साह हा जसजशी वेळ बदलत गेली तसा मावळत गेला हेदेखील तितकेच खर.
मात्र युथ फेलोशिपपेक्षा Advance Youth Fellowship हे नक्कीच वेगळे आहे. शिवाय त्यामध्ये असणा-या आठ टीम्स आणि प्रत्येकाचे विषयदेखील निराळे आणि तितकेच महत्वाचे आहेत. Orientaton workshop च्या निमित्ताने एकमेकांना एकमेकांचे विषय समजून घेण्यासाठी मदत झाली.

प्राथमिक अभ्यास
प्राथमिक प्रस्तावावर पुकारमध्ये मिलिंद सर आणि सुनिलशी झालेल्या चर्चेचा आधार घेत नोव्हेंबर 2010 मध्ये आम्ही प्राथमिक अभ्यास हा काही उपनगरीय स्थानकांदरम्यान केला. सीएसटी, भायखळा आणि घाटकोपर रेल्वे स्थानक आदी ठिकाणी पूर्ण केला. Pilot Study च्या माध्यमातून विषयाबद्दलची आमची जाण आणखी वाढत गेली. तसेच आमच्या अभ्यासाच्या मर्यादादेखील लक्षात आल्या. प्राथमिक संशोधनानंतर आम्ही आमचा अंतिम स्वरूपाचा प्रस्ताव तयार केला. प्राथमिक संशोधनानंतर संशोधनाच्या पद्धतीत बदल करत विशेषतः माहिती संकलनाचा अभ्यास करत केस स्टडीचा आधार घेण्याचे ठरवले. त्यासाठी संजय रानडे यांच्याशी जानेवरीच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चर्चेचा फायदा झाला.

ब्लॉग
पुकारच्या संशोधनाचाच एक भाग म्हणून आम्ही हमालदील या नावाचा ब्लॉग सुरू केला. त्यानंतर ब्लॉगवर हमालांविषयीची माहिती अपडेट केली.
रिसर्च जत्रा
रिसर्च जत्रा हा उत्सव आम्हाला खुप आवडला. युथ फेलोशिपसमोर  अॅडव्हान्स युथ फेलोशिप करणा-या विद्यार्थ्याना विषय मांडण्याची संधी रिसर्च जत्राच्या माध्यमातून मिळाली.
Resource Person’s
Prof. Chandrashil Tambe, (C.H.M. College, Ulhasnagar)
Prof. Sanjay Ranade, (Reader, Dept. MCJ)
Dr. Rita Sawala, ( Radhi Foundation)
Sameer Zaveri, (suburban passenger association)


No comments:

Post a Comment